एकाच लाँचरमधून दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
डीआरडीओची मोठी कामगिरी : प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या संरक्षण क्षमतेला नवी मजबुती देत डीआरडीओने प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वी सॅल्वो लाँच केले आहे. ही परीक्षण देशाचे स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि त्वरित प्रतिक्रिया क्षमतेचे मोठे प्रदर्शन मानले जात आहे. एकाच लाँचरमधून अत्यंत कमी वेळेत दोन क्षेपणास्त्रांचे यशस्वी परीक्षण खरोखरच महत्त्वाची कामगिरी आहे.
बुधवारी सकाळी 10.30 वाजता ओडिशाच्या किनाऱ्यानजीक एकाच लाँचरमधून दोन प्रलय क्षेपणास्त्रs डागण्यात आली आहेत. हे उ•ाण परीक्षण यूजर इव्हॅल्युशन ट्रायल्स अंतर्गत करण्यात आले. दोन्ही क्षेपणास्त्रांनी निर्धारित करण्यात आलेल्या दिशेचे पूर्णपणे पालन केले आणि सर्व उ•ाण उद्देशांना यशस्वीपणे प्राप्त केले आहे.
ट्रॅकिंग अन् टेलिमेट्रीने पुष्टी
या परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्रांच्या उ•ाणावर नजर ठेवण्यात आली. चांदीपूर येथील एकीकृत परीक्षण रेंजद्वारे तैनात टॅकिंग सेंसर्सनी पूर्ण ट्रॅजेक्टरीची पुष्टी केली. तर लक्ष्य क्षेत्रानजीक तैनात जहाजांवर बसविण्यात आलेल्या टेलिमेट्री सिस्टीमद्वारे अंतिम टप्प्यातील घटनांनाही यशस्वीपणे रिकॉर्ड करण्यात आले.
प्रलय क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्या
प्रलय एक स्वदेशी ठोस इंधनाने संचालित होणारे क्वासी-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. यात अत्याधुनिक गायडेन्स आणि नेव्हिगेशन सिस्टीम लावण्यात आले आहेत, यामुळे हे अत्यंत अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र विविध प्रकारची वॉरहेड नेण्यास सक्षम आहे. प्रलय क्षेपणास्त्राचा विकास हैदराबाद येथील रिसर्च सेंटर कॉम्प्लेक्सच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. यात डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांचे सहकार्य राहिले आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकास-सह-उत्पादन भागीदाराच्या स्वरुपात सिस्टीम इंटीग्रेशनचे काम केले.
संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी सॅल्वो लाँचवर डीआरडीओ, भारतीय सैन्य, वायुदल आणि संरक्षण सार्वजनिक उपक्रमांचे अभिनंदन केले आहे. ही कामगिरी क्षेपणास्त्र प्रणालीची विश्वसनीयता सिद्ध करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. हे यश प्रलय क्षेपणास्त्र लवकरच सैन्यात सामील होण्याची तयारी दर्शवित असल्याचे डीआरडीओ प्रमुखांनी नमूद केले आहे.
Comments are closed.