‘इक्कीस’ ही शेवटची अनमोल निशाणी आहे…’ केबीसीवर धर्मेंद्रांना आठवून भावुक झाले अमिताभ बच्चन – Tezzbuzz

अगस्त्य नंदा आणि धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘इक्कीस’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चित्रपटसृष्टीसाठी तसेच धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी अतिशय खास मानला जात आहे, कारण हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगितले जाते. रिलीजपूर्वीपासूनच ‘इक्कीस’ स्टारकास्ट, कथा आणि भावनिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होता. नुकतेच या चित्रपटाची संपूर्ण टीम ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी बोलताना अमिताभ बच्चन भावूक झाले.

या भागाचा प्रोमो शेअर केला असून, त्यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)म्हणतात, “चित्रपट ‘इक्कीस’ ही आमच्यासाठी एक अमूल्य आठवण आहे, जी हिंदी चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्त्वाने आपल्या चाहत्यांसाठी मागे ठेवली आहे. एक कलाकार शेवटच्या श्वासापर्यंत कलेची साधना करत राहतो आणि हेच माझे मित्र, माझे कुटुंब, माझे आदर्श धर्मेंद्र देव यांनी करून दाखवले.” पुढे ते म्हणाले, “धर्मेंद्र फक्त एक व्यक्ती नव्हते, ते एक भावना होते. भावना कधीच निघून जात नाहीत, त्या आठवणी आणि आशीर्वाद बनून कायम सोबत राहतात.”

चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अभिनेता जयदीप अहलावत यांनीही धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी स्वतःला खूप नशीबवान समजतो कारण या चित्रपटात माझे सर्वाधिक सीन धर्मेंद्र सरांसोबत आहेत. सेटवर ते कधीच मोठे स्टार वाटत नव्हते, अगदी कुटुंबातील सदस्यासारखे वागत होते.”

यावेळी अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्याशी संबंधित एक खास आठवणही सांगितली. त्यांनी सांगितले की, ‘शोले’च्या शूटिंगदरम्यान बेंगळुरूमध्ये काम सुरू असताना धर्मेंद्र अतिशय तंदुरुस्त आणि ताकदवान होते. एका सीनमध्ये त्यांनी मल इतक्या जोरात पकडले होते की तो सीन खऱ्या अर्थाने वेदनादायक वाटत होता. त्यामुळे तो अभिनय अधिक नैसर्गिक दिसला.’ हसत अमिताभ म्हणाले की, हीच धर्मेंद्र यांची खासियत होती — त्यांची फिटनेस आणि प्रामाणिक मेहनत. ‘इक्कीस’ हा चित्रपट केवळ एक सिनेमाच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाला दिलेली भावनिक मानवंदना ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
७५ वर्षांचा स्टार, २७ एकर फार्महाऊसचा मालक; तरीही 1BHK मध्ये जगतो साधं आयुष्य

Comments are closed.