रोहित-विराट टिकले, शमीला धक्का, काही स्टार्स मिळणार प्रमोशन; 2026 साठी अशी असेल BCCI ची कॉन्ट्र

BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स 2026 अपडेट बातम्या : बीसीसीआय लवकरच भारतीय क्रिकेटपटूंसाठी 2026 चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करणार असून, यंदा या यादीत मोठे आणि धक्कादायक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही दिग्गज खेळाडूंचे ग्रेड बदलले जाणार आहेत, तर काही युवा खेळाडूंना मोठं प्रमोशन मिळू शकतं.

सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. दोघेही आतापर्यंत A+ ग्रेडमध्ये होते, मात्र यावेळी त्यांना A ग्रेडमध्ये खाली आणले जाऊ शकते. दुसरीकडे, सध्याच्या फॉर्म आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांना A+ ग्रेडमध्ये बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे खेळाडू B ग्रेडमध्ये कायम राहू शकतात. विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी करणारा देवदत्त पडिक्कल देखील यावेळी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग होण्याची शक्यता आहे. पण मोहम्मद शमीचा पत्ता कट होऊ शकतो.

मागील सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या A+ ग्रेडमध्ये किती खेळाडू होते?

1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीतील करारानुसार टी20 मधून निवृत्त असूनही बीसीसीआयने कोहली आणि रोहित यांना A+ ग्रेडमध्ये ठेवले होते. साधारणपणे या ग्रेडमध्ये तीनही फॉर्मेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंनाच स्थान मिळते. मागील करारात A+ ग्रेडमध्ये हे चार खेळाडू होते. विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यापैकी बुमराह तीनही फॉर्मेट खेळतो, तर जडेजाही टी20 मधून निवृत्त झाला आहे.

संभाव्य बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2026

A+ ग्रेड – वार्षिक ₹7 कोटी – जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, अक्षर पटेल.

A ग्रेड – वार्षिक ₹5 कोटी – विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुल, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव.

B ग्रेड – वार्षिक ₹3 कोटी – ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, तिलक वर्मा, ईशान किशन.

सी ग्रेड – वार्षिक ₹1 कोटी – रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, हर्षित राणा.

हे ही वाचा –

Vijay Hazare Trophy Points Table : मुंबई टेबल टॉपर, सरफराज खानच्या तुफानी खेळीच्या जोरावर विजयाचा चौकार, क्वार्टर फायनलचं समीकरण झालं रंजक

आणखी वाचा

Comments are closed.