SA20 – ब्रेव्हिस अन् रुदरफोर्डची कहर फटकेबाजी; सलग 6 चेंडूवर ठोकले 6 षटकार, पाहा व्हिडीओ

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या टी-20 लीग SA20 ची धूम सुरू आहे. 26 डिसेंबर पासून ही लीग सुरू झाली असून एकाहून एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रिटोरिया कॅपिटल्स आणि एमआय केपटाऊन संघात झालेल्या लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या लढतीत डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी सलग सहा चेंडू सहा षटकार ठोकण्याचा कारनामा केला.

Comments are closed.