‘बॉम्बे वेलवेट’ फ्लॉप ठरल्यानंतर अनुराग कश्यपचं रणबीर-अनुष्कासोबतचं नातं बदललं, म्हणाले – त्यांचा सामना कसा करू? – Tezzbuzz

दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेलवेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या अपेक्षांवर पाणी फेरणारा ठरला. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहरसारख्या मोठा  स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना भावला नाही. आर्थिकदृष्ट्याही हा सिनेमा मोठा तोट्याचा ठरला. आता या अपयशाबद्दल अनुराग कश्यपने पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केले असून, या चित्रपटामुळे रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मासोबतचे नाते कसे बदलले याचा खुलासा केला आहे.

एका अलीकडील मुलाखतीत अनुराग कश्यप (Anurag Kashyap)म्हणाले की, ‘बॉम्बे वेलवेट’चा विषय निघाला की रणबीर नाराज होतो. तो मला म्हणायचा – तू सतत या चित्रपटाबद्दल का बोलतोस? झाला तो फ्लॉप, सोडून दे ना. पण लोक सतत मला याचबद्दल प्रश्न विचारतात, त्यामुळे मी ते टाळू शकत नाही.” अनुराग यांनी सांगितले की चित्रपट अपयशी ठरल्यानंतर रणबीर आणि अनुष्काला सामोरे जाणे त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या अवघड झाले होते.

ते पुढे म्हणाले, “त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर मी स्वतःही खूप अडचणीत होतो. त्यामुळे आम्ही हळूहळू एकमेकांपासून दूर गेलो. आजही भेट झाल्यावर आम्ही एकमेकांना मिठी मारतो, पण पूर्वीसारखा संपर्क राहिला नाही.” त्या काळात स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी लहान आणि वेगळ्या धाटणीचा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण लक्ष ‘रमन राघव 2.0’ वर केंद्रित केले, असेही त्यांनी सांगितले.

‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट ज्ञान प्रकाश यांच्या Mumbai Fables या पुस्तकावर आधारित होता. सुमारे 115 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात फक्त 43 कोटींची कमाई केली, तर भारतात अवघी 23.71 कोटी रुपये कमावले. आजही हा चित्रपट बॉलिवूडच्या मोठ्या अपयशांपैकी एक मानला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रोम ट्रिपवर विजय देवरकोंडा-रश्मिका मंदाना एकत्र? न्यू ईयर २०२६ पोस्टने वाढली चर्चा

Comments are closed.