महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचा विजयाचा सपाटा, आठ नगरसेवक जिंकले, कल्याण डोंबिवली –

भिवंडी: कल्याण डोंबिवली, धुळे, पनवेलनंतर आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पहिला विजय मिळाला आहे. वार्ड क्रमांक १७ (ब) मधून भाजपचे उमेदवार (BJP Municipal Corporation Result 2026) सुमित पाटील यांच्यासमोर असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे. सुमित पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे असून, त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीतील हा भाजपचा पहिलाच अधिकृत विजय ठरला असून, आगामी वॉर्डांमध्येही भाजपची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. (BJP Municipal Corporation Result 2026)

मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक १७ (ब) मधून भाजपचे उमेदवार सुमित पाटील यांच्यासमोर असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे. यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वाावरण दिसून येत आहे. सुमित पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे आहेत. आत्तापर्यंत भाजपने सात विजय मिळवल्याचे समोर आले आहे.

BJP Municipal Corporation Result 2026: कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तीन उमेदवार विजयी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला. येथील प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र.26-क मधून आसावरीताई केदार नवरे यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी दोन्हीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी, चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन दोन्ही महिला उमेदवारांचे बोलणे करुन दिले.

BJP Municipal Corporation Result 2026: धुळ्यात भाजपाचा तीन उमेदवार बिनविरोध

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काल दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाचं खातं उघडलं होतं. आज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता भाजपाचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झाले आहे. ह्या विजयामुळे भाजपची आता विजयाकडे घोडदळ सुरू झाली असून पुढील काही वेळात अजून काही नगरसेवक हे बिनविरोध होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. धुळे महानगरपालिकेत महिला राज्य येणार असल्याची प्रतिक्रिया देखील आता भाजपमधून व्यक्त होऊ लागली असून  सुरेखा उगले यांच्या विरोधात उभ्या असलेल्या  अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

BJP Municipal Corporation Result 2026: पनवेल महापालिकेत भाजपचा पहिला नगरसेवक विजयी

प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे. या प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराने दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरवण्यात आला. त्यामुळे निवडणूक रिंगणात एकमेव उमेदवार उरलेल्या नितीन पाटील यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली.

आणखी वाचा

Comments are closed.