OpenAI ने AI तज्ज्ञांना दिले अभूतपूर्व वेतन पॅकेज, Google आणि इतर कंपन्यांना टाकले मागे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे क्षेत्र भविष्यातील सर्वाधिक पगार देणारा जाॅब ठरणार आहे. त्यामुळे आता AI मुळे केवळ तंत्रज्ञान सुलभ होणार नाही तर, भरघोस पगाराची नोकरीदेखील मिळणार आहे. AI स्किल्सच्या मागणीत वृद्धी झाल्यामुळे OpenAI ने आपल्या कर्मचार्यांना देण्यात येणाऱ्या पगारामध्येही भरघोस वाढ केली आहे. अहवालानुसार, OpenAI चे कर्मचाऱ्यांना दरवर्षी सुमारे 1.5 मिलियन डॉलर, म्हणजे हिंदुस्थानी रुपयांत अंदाजे 13.5 कोटी रुपये, पगार देऊ केला आहे. हा पगार इतर टेक कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक मानला जात आहे.
The Wall Street Journal नुसार, OpenAI च्या स्टॉक-आधारित बोनसमुळे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पॅकेज हे सर्वाधिक आहे. सध्याच्या घडीला OpenAI मध्ये सुमारे 4,000 कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कंपनीच्या वेतन बजेटवर मोठा दबाव आहे. 2003 मध्ये Google च्या IPO पूर्वीच्या स्टॉक पॅकेजच्या तुलनेत OpenAI च्या सध्याच्या पॅकेजची सातपट जास्त आहे. OpenAI आता AI रिसर्चर आणि इंजिनियर्ससाठी अधिकाधिक आकर्षक संधी निर्माण करत आहेत. या बोनसमुळे काही कर्मचार्यांना अल्पावधीतच बक्कळ रकमेची बेगमी मिळणार आहे. मात्र, इतके मोठे पॅकेज कंपनीच्या ऑपरेशन खर्चावर चांगलाच ताण निर्माण करत आहे. त्यामुळे सध्याच्या शेअरहोल्डर्सच्या हिस्स्यांवर परिणाम होत आहे.
मेटा सारख्या कंपन्यांनी देखील AI रिसर्चर्ससाठी कोट्यवधी डॉलरचे पॅकेज ऑफर केले. यामुळे काही OpenAI कर्मचारी Meta मध्ये गेले, ज्यात ChatGPT चे सह-निर्माते शेंगजिया झाओ देखील आहेत. या स्पर्धेमुळे AI कौशल्ये आज सर्वाधिक वेतन मिळवण्याचे क्षेत्र बनली आहेत.

Comments are closed.