तिकीट नाकारल्यानं झोल केला अन् डुप्लिकेट एबी फॉर्म भरला; भाजप नेत्याची चोरी पकडली गेली

राज्यात 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र महायुतीमध्ये एबी फॉर्मवरून चांगलाच गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी नाराजांचा उद्रेक झाला. मात्र मुंबईत एका इच्छुक उमेदवाराने चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म दाखल केला. अखेर त्याची चोरी पकडण्यात आली आणि हा गैरप्रकार उघडकीस आला. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे.

मुंबईतील सायन येथे हा प्रकार घडला आहे. प्रतिक्षा नगर येथील प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुस्कर या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे त्यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज सादर केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिती उमेदवाराने डुप्लिकेट फॉर्म जोडल्याचे नमूद करत अर्ज रद्द करण्याची मागणी केली.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.