Photo : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची झुंबड, पोलिसांचाही चोख बंदोबस्त

छाया – दीपक साळवी

संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. न्यूझीलंड या देशात सर्वात पहिल्यांदा नववर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इतर देशात फटाक्यांच्या आतिषबाजीसह नववर्षाचे स्वागत करण्यात आले. मुंबईतही मरिन लाइन्स येथे मुंबईकरांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मरिन लाइन्सची ‘क्वीन नेकलेस’ म्हणूनही ओळख आहे. ज्यामुळे या ठिकाणी दरवर्षीच नागरिकांची मोठी गर्दी होत असते. पण या गर्दीमुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच कोणतीही अघटित घटना होऊ नये किंवा नववर्षाच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय, मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे असलेल्या गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments are closed.