IND Vs PAK – नवीन वर्षात दोन वेळा हिंदुस्थान-पाकिस्तान आमने-सामने; तारखा लक्षात ठेवाच

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की सर्व कामे बाजूला ठेवून सामना पाहण्यासाठी वेळ दिला जातो. मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावापूर्ण आहेत. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामने ICC स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांव्यतिरिक्त खेळले जात नाहीत. यंदाच्या वर्षी फक्त दोन वेळा दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनामध्ये T-20 World Cup 2026 खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ यंदाच्या वर्षात पहिल्यांदा एकमेकांना भिडणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी उभय संघांमध्ये कोलंबो येथील प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. याव्यितिरिक्त सेमीफायनल किंवा फायनलमध्येही दोन्ही संघांना एकमेकांना भिडू शकतात. पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कप संपताच जून महिन्यामध्ये महिलांच्या टी-20 वर्ल्ड कपचा धुरळा सुरू होणार आहे. याही स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे उभय संघांमध्ये 14 जून रोजी सामना खेळला जाणार आहे.
नववर्षात वर्ल्ड कपची धम्माल अन् धमाका; क्रिकेटपासून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉलचे वर्ल्ड कप रंगणार

Comments are closed.