जळगावमध्ये ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, किडनॅप केल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युत्या तर काही ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत. तर कुठं स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही महानगरपालिकांमध्ये काहीजण बिनविरोध देखील निवडून गेले आहेत. दरम्यान, काही भागात उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याचीही देखील चर्चा सुरु आहे. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सताधारी पक्षाच्या वतीने, धाक दपटशा सह प्रलोभन देण्यासह किडनॅप केले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केला आहे. आमचे तीन उमेदवार नॉट रिचेबल असल्याचा दावाही शिवसेना ठाकरे गटाचे संजय सावंत यांनी केला आहे.

नॉट रीचेबल असलेल्या उमेदवारांचे बरे वाईट होण्याची भीती

जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नॉट रीचेबल असलेल्या उमेदवारांचे बरे वाईट होण्याची भीती व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार पर्वताबाई भिल व सागर पाटील यांच्यासह अन्य एक ठाकरे गटाचा उमेदवार हा बेपत्ता असल्याचा संजय सावंत यांनी दावा केला आहे. महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असून बिहार पॅटर्न राबविलाजात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी  केला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप एक व शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप एक व शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदे गटाचे उमेदवार गौरव सोनवणे बिनविरोध झाले आहेत. मात्र माघार घेणारा उमेदवार हा नॉट रिचेबल असून, त्याच्या सह ठाकरे गटाचे अजूनही तीन उमेदवार नॉट रिचेबल असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या पार्वताबाई भिल व सागर पाटील या उमेदवारांसह अन्य एक उमेदवार हा बेपत्ता असून महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप संजय सावंत यांनी केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.