Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दि

Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या महापालिका निवडणुकीमध्ये बंडोखरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतील. त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पहावं लागेल. दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. (Municipal Corporation Election 2026)
 

Comments are closed.