हा खेळाडू आहे की सुपरमॅन? एका सामन्यातच बॅटिंग, बॉलिंग आणि कीपिंग करत टीमसाठी रोमांचक विजय मिळवला
क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल, हे सांगता येत नाही. याच अनिश्चिततेने SA20 लीग 2025-26 मधील 9व्या सामन्यात प्रेक्षकांना रोमांचक अनुभव दिला. या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्स आणि डरबन सुपर जायंट्स यांचा सामना झाला. थरारक सामन्यात दोन्ही संघांनी शेवट पर्यंत लढा दिला. शेवटी सामना टाई झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये जोबर्ग सुपर किंग्सने रोमांचक विजय नोंदवला. या विजयानंतर डेनोवन फरेरा जोबर्गचा सुपर हीरो ठरला.
फरेरा या सामन्यात खऱ्या अर्थाने सुपरमॅन ठरला. त्याने फलंदाजीत, गोलंदाजीत आणि यष्टीरक्षकात तीनही क्षेत्रात आपल्या कमाल कौशल्याची झलक दाखवली. यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फरेराच्या या सुपर ऑलराउंड प्रदर्शनामुळेच जोबर्ग सुपर किंग्सने SA20 लीगमध्ये आपली विजय हॅट्ट्रिक कायम ठेवली.
सामन्याच्या सुरुवातीला फरेराने जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने केवळ 10 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. या वादळी खेळीत त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारून संघासाठी मोलाच्या धावा केल्या. फरेराने नंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 4 षटकात 24 धावा गमावून 1 विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीमुळे संघ टायपर्यंत सामना टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला.
https://chat.whatsapp.com/LEwPKes7Mwv4e1L4Cyvhxh
क्रिकेटच्या प्रत्येक ब्रेकिंग अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉइन व्हा.. 👆👆
सर्वात रोमांचक क्षण आला सुपर ओव्हरमध्ये. फरेराने संघासाठी कीपिंग करताना अद्भुत रनआउट केले. त्याच्या यशस्वी कीपिंगमुळे जोबर्गला फक्त 6 धावांचा लक्ष्य मिळाला, जो त्यांनी सहज पूर्ण केला. एका सामन्यात फरेराने तिनही विभागात अद्वितीय प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले.
Comments are closed.