निवडणुकीआधीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध, भाजपाचे सर्वाधिक; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया,

संजय राऊत महानगरपालिका निवडणूक 2026: कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने (BJP) विजयाच शंखनाद फुंकला होता. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने 9 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यातील 8 महापालिकेत एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. (Municipal Corporation Election 2026)

राज्यात बिनविरोध निवडून आणण्याचं काम सुरु आहे. धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जाताय. भाजपा आणि मिंदेमध्ये चढाओढ सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्याचा दबाव आणाला जातोय. याला तुम्ही लोकशाही म्हणता?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. जळगावला उमेदवारांचं अपहरण करण्यात आलं. धमक्या देऊन अर्ज मागे घ्यायला लावले.  आम्हालाही धमक्या सगळीकडून आल्या, पण आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले.

शिंदे गटाचे स्थान अधिक भक्कम-

कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच प्रभाग क्र. 24 मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पार्टीचाही एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंगे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

8 महापालिकेतील भाजपचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध- (Municipal Corporation Election 2026)

1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी

2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे

3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर

4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील

5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील

6. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले

7. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

8. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले

9.पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील

10.भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपचे सुमित पाटील

11.जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे

12.पिंपरी-चिंचवड – भोसरी प्रभाग 6 मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध

दोन महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे 7 बिनविरोध- (KDMC Election Result 2026)

1. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे

2. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे

3. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिंदेंच्या शिवसेनेचे वृषाली जोशी

4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोर

5. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे

6. जळगाव – प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध

७. जळगाव – प्रभाग 9 ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध

अहिल्यानगरमध्ये अजित पवाराचे दोन बिनविरोध- (Ahilyanagar Municipal Election 2026)

1.अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे

2.अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक 14 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे

मालेगावमध्ये एक बिनविरोध- (Malegaon Municipal Election 2026)

1. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026: आदित्यसह अमित ठाकरे आज शिवसेना भवनात पोहोचणार; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.