10 महापालिकांसाठी 18 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, पुण्यात सर्वात जास्त, तर वसई-विरारमध्ये सर्वात कमी
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख 10 महापालिकांसाठी जवळपास 18 हजार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा उडताना पाहायला मिळत आहे. या सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 29 महापालिकांसाठी तब्बल 33 हजार 606 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
राज्यातील 2 हजार 869 नगरसेवकपदांसाठी होणार्या या निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे, तर पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक 3,179 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तसेच मुंबई महापालिकेत 227 जागांसाठी 2,516 जणांनी शड्डू ठोकला आहे. नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी िंकवा पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेत सर्वात जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी एकूण 165 जागा असून 3 हजार 179 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 2 हजार 516 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. नाशिकमध्ये 2 हजार 356, तर पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी 1 हजार 993 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगर 1 हजार 870, सोलापूर 1 हजार 460 आणि नागपूर 1 हजार 452 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
महानगरपालिका एकूण जागा उमेदवारी अर्ज
पुणे 165 3,179
मुंबई 227 2,516
नाशिक 122 2,356
पिंपरी-चिंचवड 128 1,993
छत्रपती संभाजीनगर 115 1,870
सोलापूर 102 1,460
नागपूर 151 1,452
ठाणे 131 1,128
नवी मुंबई 111 956
वसई-विरार 115 935
Comments are closed.