Paush Purnima 2026 : 2 की 3 जानेवारी, नववर्षातील पहिली पौर्णिमा नक्की कधी?
हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. 2026 मधील पहिली पौर्णिमा महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो. असं म्हणतात की या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच भगवान विष्णूंची पूजा करणे आणि गरजूंना दान देणं शुभ असते. यावर्षीची पौष पौर्णिमा 2 की 3 जानेवारीला याबाबत अनेकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे, जाणून घेऊयात नववर्षातील पहिली पौर्णिमा नक्की कधी आहे.
पौष पौर्णिमा 2026 तिथी –
पौष पौर्णिमा 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6.53 वाजता सुरु होईल आणि 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.32 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार 3 जानेवारी 2026 रोजी पौष पौर्णिमेचे व्रत करणे योग्य राहील.
हेही वाचा – January 2026 Horoscope : जानेवारी महिना या राशींना ठरणार लकी, पडणार पैशांचा पाऊस
पूजाविधी –
- सर्वप्रथम ब्रम्ह मुहूर्तावर उठून गंगा नदीत किंवा घरी गंगाजलाने स्नान करा.
- स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा.
- उपवासाचे व्रत करा.
- सूर्याला भांड्यात पाणी, फूले आणि सिंदूर अर्पण करा.
- यानंतर पिवळ्या कपड्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवा.
- यानंतर तुळशीची पाने, चंदन, अखंड अक्षता, धूप, नैवेद्य अर्पण करा.
- विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा.
- तुम्ही तुळशीच्या माळेने जपदेखील करू शकता.
या वस्तू दान करू शकता –
पौष पौर्णिमेला काही वस्तू दान केल्यान ग्रहदोष आणि नकारात्मक प्रभाव कमी होतो. या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ असते. तुम्ही तांदूळ, साखर, चांदी, पांढरे कपडे दान करू शकता.
हेही वाचा – January 2026 : नववर्षाच्या पहिल्या महिन्यातील व्रत-उत्सवांची संपूर्ण यादी !
Comments are closed.