४० वर्षीय घटस्फोटित अभिनेत्री पुन्हा प्रेमात, सहकलाकारावर जडलं मन; २०२१ मध्ये पतीपासून झाली होती वेगळी – Tezzbuzz
१६ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेली अभिनेत्री कीर्ती कुल्हारी पुन्हा एकदा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कीर्तीने आता आपल्या नव्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’मधील सहकलाकार राजीव सिद्धार्थ यांच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.
कीर्ती कुल्हारीने (Kirti Kulhari)नववर्षाच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये तिच्या आयुष्यातील काही सुंदर क्षण पाहायला मिळतात. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन दिलं आहे,“एक चित्र हजार शब्दांइतकं बोलतं… #happynewyear #happy2026 सर्वांना.” या पोस्टमधून कीर्ती आणि राजीव यांनी आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. दोघांनीही एकत्र रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना नव्या वर्षाची शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कीर्ती कुल्हारी आणि राजीव सिद्धार्थ यांच्या डेटिंगच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कीर्तीने राजीवसोबत काही फोटो शेअर केले होते, ज्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळालं होतं. एका फोटोमध्ये ती राजीवच्या खांद्यावर डोकं ठेवून दिसत होती. त्या फोटोला तिने कॅप्शन दिलं होतं —“#paininmyneck आणि माझा #icepack @rajeevsiddhartha सोबत.” दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडून दिसत होते.
कीर्ती कुल्हारीने २०१६ साली अभिनेता साहिल सहगल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्या काळात कीर्तीने सोशल मीडियावर सांगितलं होतं की, हा अनुभव तिच्यासाठी कठीण असला तरी त्यातून ती अधिक भावनिकदृष्ट्या मजबूत झाली आणि नव्याने आयुष्याकडे पाहण्याची ताकद तिला मिळाली. आता पुन्हा एकदा प्रेमात पडलेली कीर्ती कुल्हारी आनंदी दिसत असून, तिच्या चाहत्यांकडून तिला नव्या नात्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पॅपाराझींपासून मुलीला वाचवताना दिसले राज कुंद्रा, एअरपोर्टवर झाकला ५ वर्षांच्या समीशाचा चेहरा
Comments are closed.