न्यूझीलंड मालिकेपूर्वी शुबमन गिल 'या' स्पर्धेत खेळणार, अर्शदीप सिंगलाही मिळणार संधी!

शुबमन गिल आपल्या आवडत्या फॉरमॅटमध्ये बॅटने धमाका करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी गिलचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. मात्र, किवी संघाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी गिल विजय हजारे टूर्नामेंट मध्ये खेळताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, शुभमनसोबतच अर्शदीप सिंग सुद्धा पंजाब संघाकडून आपली चमक दाखवताना दिसेल.

शुबमन गिल आणि अर्शदीप सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी पुढचे दोन सामने खेळणार आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, 3 जानेवारीला सिक्कीमविरुद्ध आणि 6 जानेवारीला गोव्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गिल आणि अर्शदीप पंजाब संघाची ताकद वाढवताना दिसतील. दरम्यान, टी20 वर्ल्ड कप 2026 साठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात शुभमनला जागा देण्यात आलेली नाही.

अर्शदीप सिंग मात्र वर्ल्ड कप टीमचा भाग आहे. असे मानले जात आहे की, अर्शदीपला वनडे मालिकेत विश्रांती देऊन पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघात निवडले जाऊ शकते. वर्ल्ड कप संघातून डावलल्यानंतर, निवडकर्ते कदाचित गिलला टी20 संघात पुन्हा संधी देणार नाहीत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत शुबमन गिलची बॅट पूर्णपणे शांत होती. गिल तीन सामन्यांत मिळून फक्त 32 धावाच करू शकला होता. पहिल्या टी2पी मध्ये शुबमन 4 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या टी20 मध्ये गिलने 28 धावा करण्यासाठी 28 चेंडू घेतले होते. या कामगिरीनंतर गिल वर्ल्ड कप संघाच्या शर्यतीत मागे पडला. मात्र, आता वनडे फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करून गिल निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात असेल.

Comments are closed.