आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकन संघाची घोषणा; या खेळाडूकडे कर्णधारपद
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत यंदा एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेपूर्वी सर्व संघ आपापले स्क्वॉड जाहीर करत असून, आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही टी20 वर्ल्ड कपसाठी आपल्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कमान यावेळीही एडन मार्करमकडेच सोपवण्यात आली आहे. संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पूर्णपणे फिट असून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. रबाडा यापूर्वी बरगडीच्या दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता, मात्र आता तो पुनरागमनासाठी सज्ज आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी ही संघाची मोठी ताकद ठरणार आहे. कगिसो रबाडासोबत एनरिक नॉर्टजे, मार्को जेनसेन, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश आणि युवा क्वेना मफाका यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पेस फॅक्टरी कोणत्याही फलंदाजीला अडचणीत आणण्याची क्षमता ठेवते.
फलंदाजी विभागातही दक्षिण आफ्रिकेचा संघ संतुलित दिसत आहे. कर्णधार एडन मार्करमसोबत अनुभवी क्विंटन डी कॉकने निवृत्तीतून परत येत संघात जागा मिळवली आहे. त्याचबरोबर डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे आणि डोनोवन फरेरा हे संघातील महत्त्वाचे खेळाडू असतील. अनुभवी डेविड मिलरवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी असणार आहे.
मात्र, या संघात रिझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, जेराल्ड कोएत्झी, ओटनील बार्टमन, ब्योर्न फोर्टुइन आणि तबरेज शम्सी यांना संधी मिळालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेचा टी20 वर्ल्ड कप 2026 संघ
एडन मार्कराम (उजवीकडे), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक (wk), टोनी डी जोर्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को जेन्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, जेसन स्मिथ.
Comments are closed.