Dry Skin Care : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? आजच फॉलो करा हे रुटीन
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होते. वातावरणातील गारव्यामुळे त्वचेची संबंधित अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्वचा काळवंडणे. थंडीमुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स नक्की फॉलो करायला हव्यात, ज्यामुळे त्वचा मुलायम राहील. चला तर मग जाणून घेऊयात थंडीतही मुलायम त्वचेसाठी काय करायला हवे.
फॉलो करा हे रुटीन –
- दररोज अंघोळीच्या एक तास आधी संपूर्ण शरीराला आणि चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करा, यामुळे त्वचा मुलायम राहते.
- चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.
- जर थंडीत प्रवास करत असाल तर मॉयश्चरायझरचा वापर करा. कारण या दिवसात त्वचा कोरडी होते. मॉयश्चरायझरचा वापर केल्यास त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहते.
- हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर मिसळून चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
- थंडीच्या दिवसात दुधाची साय चेहऱ्यासाठी चांगली असते. चेहऱ्यावर दुधाची साय 10 मिनिटे लावा. असे केल्याने चेहरा फ्रेश राहतो.
- थंडीच्या दिवसात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि उर्जाही मिळते. तसेच आपली त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत होते.
हेही वाचा – Fashion Outfits: महिलांच्या फॅशनमध्ये पेस्टल रंगांची पसंती
Comments are closed.