शमी पुन्हा बाहेर, पंत-सिराजचे पुनरागमन! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ‘या’ दिग्गजाने निवडला भारतीय संघ
भारतीय क्रिकेट संघाची या वर्षातील पहिली मालिका न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) होणार असून, पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळवला जाईल. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) अद्याप अधिकृत संघाची घोषणा केलेली नाही. मात्र, शनिवारी 3 जानेवारी रोजी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash chopra) आपला संभाव्य संघ निवडला आहे.
भारताची शेवटची वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. शुबमन गिलच्या (Shubman gill) अनुपस्थितीत केएल राहुलने (KL Rahul) या मालिकेचे नेतृत्व केले होते आणि भारताने ती मालिका 2-1 ने जिंकली होती. विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, कोहलीने मागील 3 सामन्यांत 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले होते.
आकाश चोप्राने शुबमन गिलला कर्णधार म्हणून निवडले आहे. श्रेयस अय्यरला अद्याप फिटनेस ‘क्लिअरन्स’ न मिळाल्याने तो या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चोप्राने ऋतुराज गायकवाडला 4 थ्या किंवा 5 व्या क्रमांकासाठी संघात स्थान दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. ध्रुव जुरेल किंवा ईशान किशनला त्याने संघात स्थान दिलेले नाही. पंतची काय चूक आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे, परंतु आकाश चोप्राने मोहम्मद शमीला आपल्या संघात जागा दिलेली नाही.
आकाश चोप्रांनी निवडलेला संभाव्य भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, अक्षर पटेल/रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल.
Comments are closed.