पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अपमान? माजी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने व्यक्त केली नाराजी

ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी (Jason Gilespi) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबतच्या (PCB) आपल्या 9 महिन्यांच्या कटू अनुभवावर मौन सोडले आहे. पीसीबीने अनेक बाबतीत आपला अपमान केला आणि विश्वासात न घेता निर्णय घेतले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

गिलेस्पी यांच्या मते, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हाय-परफॉर्मन्स कोच टिम नीलसन यांना पदावरून काढून टाकण्यात आले. नीलसन यांना ऑगस्ट 2024 मध्ये नियुक्त केले होते, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्यांना अचानक डच्चू देण्यात आला. मुख्य प्रशिक्षक म्हणून ही गोष्ट गिलेस्पी यांना पूर्णपणे ‘अस्वीकार्य’ वाटली.

एप्रिल 2024 मध्ये गिलेस्पी यांची कसोटी प्रशिक्षक म्हणून, तर गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी नियुक्ती झाली होती. अंतर्गत वादांमुळे ऑक्टोबर 2024 मध्ये कर्स्टन यांनी, तर डिसेंबर 2024 मध्ये गिलेस्पी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सोशल मीडियावर (X) एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिलेस्पी म्हणाले, पीसीबीने मला पूर्णपणे दुर्लक्षित केले आणि अनेक वेळा माझा अपमान झाला. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, गिलेस्पी आणि पीसीबी यांच्यात आता आर्थिक वाद सुरू आहे. आपली थकबाकी अद्याप मिळालेली नाही, असा त्यांनी दावा केला आहे. करारातील अटीनुसार, पद सोडण्यापूर्वी 4 महिने आधी नोटीस देणे बंधनकारक होते, जे गिलेस्पी यांनी पाळले नाही.

Comments are closed.