लोकशाहीच्या नावाने झुंडशाही सुरू, उमेदवारी अर्ज माघारीवरून संजय राऊत यांची टीका

सरकारी यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही सुरू आहे, उमेदवारी अर्ज माघारीवरून अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजया राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले आहेत की, “रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या आत आणून दिलेला आहे, असे समजून माघार नोंदवावी, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या प्रक्रियेत असलेला माझा एक मित्र आत्ताच मला फोनवर बोलला की, त्याने असे करणे चुकीचे होईल, असे म्हणाल्यावर त्याला लगेच पालकमंत्र्यांचा फोन आला आणि आमचे स्थानिक आमदार काय सांगतात त्याप्रमाणे करा, अशी धमकी बजा विनंती त्याला करण्यात आली.”

ते म्हणाले, “एका बाजूला आपल्या लोकांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी समोरच्या उमेदवाराना ५-५ कोटी द्यायचे व माघार घ्यायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला हे असे उद्योग करायचे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू आहे. एकदिवस इकडे नेपाळ आणि बांगलादेश प्रमाणे जन उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.”

Comments are closed.