आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांचा ऑडिओ क्लिप व्हायरल
नांदेड : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Mahanagarpalika Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून खरी निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, नांदेडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?
भारतीय जनता पक्षाने नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना निष्ठावंतांना डावलून अलीकडेच काँग्रेस व इतर पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्यांना 50 50 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. अशातच नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 14 अर्थात इतवारा मदीनानगर प्रभागात निवडणूक पॅनल तयार करताना माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या सहाय्याने खासदार अशोक चव्हाण यांनी इच्छुक उमेदवाराशी थेट मोबाईल फोनवरून संपर्क साधला. खरंतर हा प्रभाग मुस्लिमबहुल प्रभाग आहे. त्यामुळं पॅनलमध्ये एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रस्ताव इच्छुक उमेदवाराने अशोक चव्हाण व डी.पी. सावंत यांच्यासमोर ठेवला. परंतु आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, आपलं हिंदूंचं एक पॅनल तयार करु, तुम्ही इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची नावे सांगा, असे सावंत आणि चव्हाण यांनी सांगितले. तसे अपेक्षित उमेदवार सुचवता येतील पण खर्च करण्याची कुवत माझ्या सकट कुणातही नाही, असे इच्छुक उमेदवाराने सांगताच सावंत आणि चव्हाण यांनी खर्चाची संपूर्ण बाजू पक्ष सांभाळेल तुम्ही फक्त नावे द्या असे सांगितले. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा वेगवेगळ्या प्रवर्गातून पॅनल तयार करायचे होते. परंतु भाजपला या प्रभागात उमेदवारच मिळाले नाहीत.
महानगरपालिकेच्या निवडुकीला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काही जणांनी बंडखोरी देखील केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अर्ज मागे घे, विधानसभा अध्यक्षांचाच दबाव, धमक्या; खासदार अरविंद सावंतांनी सांगितला भाजपचा ‘बिनविरोध पॅटर्न’
आणखी वाचा
Comments are closed.