वैभव टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज सामना; कधी, कुठे अन् किती वाजता LIVE पाहणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 पहिला एकदिवसीय थेट प्रवाह: भारताची अंडर-19 क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीपासून खेळला जाणार असून, या लढतीत कर्णधार म्हणून युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे.

सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघांमधील एकदिवसीय सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील. मात्र, भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.

वैभव सूर्यवंशीकडे संघाची धुरा

अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा हे फिटनेसच्या समस्यांमुळे संघाबाहेर आहेत. त्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत, वैभव सूर्यवंशीकडे संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

सामना थेट कुठे पाहता येणार?

भारत अंडर-19 आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका क्रिकेटप्रेमींना थेट पाहता येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (टीव्हीवर) आणि सोनी लिव्ह अ‍ॅपवर (ऑनलाइन) थेट प्रसारित होण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ (Team India Squad for South Africa Tour) :

वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग, आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, देवेंद्रन दीपेश, किशनकुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक

  • 3 जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना, विलोमूर पार्क (बेनोनी)
  • 5 जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना, विलोमूर पार्क (बेनोनी)
  • 7 जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना, विलोमूर पार्क (बेनोनी)

हे ही वाचा –

IND Squad vs NZ ODI Series: सरफराज, ईशान, मोहम्मद शमी IN…; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा, पाहा संभाव्य Squad

आणखी वाचा

Comments are closed.