अमेरिकेचे सीरियात ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक’

अमेरिकेने सीरियामध्ये मोठय़ा प्रमाणात हवाई हल्ले केले असून या कारवाईत इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
मागच्या महिन्यात अमेरिकने सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी सीरियामध्ये हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक’ या मोहिमेचा भाग म्हणून या शनिवारी हल्ल्याचे आदेश दिले.
13 डिसेंबर रोजी पालमिरा येथे इस्लामिक स्टेटने अमेरिकन सैन्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही लष्करी कारवाई केली आहे. ‘एक्स’वर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सेंटकॉमने स्पष्ट केले की हे हवाई हल्ले या प्रदेशातील अमेरिकन लष्कर आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्याच्या संरक्षणासाठी करण्यात आले आहेत.
अमेरिकन अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, सीरियामध्ये 35 हून अधिक लक्ष्यांवर 90 पेक्षा जास्त प्रिसिजन म्युनिशन्स डागण्यात आले. या स्ट्राईकमध्ये 20 हून अधिक विमाने, ज्यामध्ये यूएस एफ-15 आणि ए-10 जेट्स, एसी-130 गनशीप्स होत्या.

Comments are closed.