नूपुर सेनन-स्टेबिन बेन यांनी कुटुंबीयांसह कव्वाली नाईटचा घेतला मनमुराद आनंद; सागर भाटियाच्या सुरांवर झुलली कृति सेनन – Tezzbuzz

क्रिश्चियन वेडिंगनंतर आता नूपुर सेनन आणि स्टेबिन बेन यांच्या कव्वाली नाईटचा एक अतिशय गोड आणि आनंदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नूपुर आणि स्टेबिन सिंगर सागर भाटियाच्या गाण्यांवर मनसोक्त थिरकत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या सुरेल मैफिलीत अभिनेत्री कृति सेनन देखील भावंडांसोबत ताल धरताना दिसत आहे.

नुपर सनॉन-स्टेबिन बेन (Stebin Ben)यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. 10 जानेवारी रोजी दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकत नवा आयुष्यप्रवास सुरू केला. या आनंदाच्या सेलिब्रेशनमध्ये कव्वाली नाईट खास ठरली. सागर भाटियाने आपल्या दमदार आणि सुरेल आवाजाने संपूर्ण संध्याकाळ जिवंत केली.
या कार्यक्रमात नूपुर चमचमीत गोल्डन लेहंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती, तर स्टेबिन बेन ऑल-ब्लॅक ट्रेडिशनल कुर्ता सेटमध्ये स्मार्ट लूकमध्ये नजर आले.

कव्वाली नाईटमधील आणखी एका व्हिडिओमध्ये कृति सेनन आपल्या कुटुंबीयांसह सागर भाटियाच्या गाण्यांवर झुलताना दिसत आहे. ब्लू रंगाच्या इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये कृति खूपच एलिगंट दिसत होती. या खास सोहळ्याला वरुण शर्मा, दिशा पटानी, मौनी रॉय, अमर कौशिक आणि दिनेश विजान यांसारखे जवळचे मित्रही उपस्थित होते.

लग्नानंतर कृति सेननने आपल्या इन्स्टाग्रामवर नूपुर आणि स्टेबिनच्या लग्नातील फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. तिने म्हटलं, “माझं हृदय खूप आनंदाने भरून आलं आहे. माझ्या लहान बहिणीला तिच्या स्वप्नातील जोडीदारासोबत लग्न करताना पाहणं माझ्यासाठी खूप खास आहे.”उदयपूरच्या फेअरमाउंट पॅलेसमध्ये पार पडलेलं हे लग्न आणि त्यानंतरची कव्वाली नाईट सध्या चाहत्यांच्या खास चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रभासच्या ‘द राजासाब’ने ओलांडला १०० कोटींचा टप्पा, जाणून घ्या दुसऱ्या दिवशीची बॉक्स ऑफिस कमाई

Comments are closed.