रोहित शर्माचा तो शॉट, जय शाह टाळ्या वाजवत बसले, अजित आगरकरांच्या रिअॅक्शनने लक्ष वेधले, VIDEO
रोहित शर्मा सिक्स इंडस्ट्रीज विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. मात्र, या विक्रमी षटकारानंतर मैदानाबाहेर बसलेल्या दोन दिग्गज व्यक्तींच्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.
नेमकं काय घडलं?
धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. डावाच्या सहाव्या षटकात त्याने ‘पुल शॉट’ मारून पहिला षटकार मारला. त्यानंतर पुढच्याच षटकात काइल जेमिसनच्या चेंडूवर मिड-ऑनच्या दिशेने अजून एक षटकार मारत त्याने कारकिर्दीतील 650 वा षटकार पूर्ण केला. रोहितने हा टप्पा गाठताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेले जय शाह यांनी टाळ्या वाजवत रोहितचे कौतुक केले. जय शाह यांच्या चेहऱ्यावर या विक्रमाचा आनंद स्पष्ट दिसत होता.
अजित आगरकरांची रिअॅक्शन चर्चेत
एकीकडे, जय शाह जल्लोष करत असताना, त्यांच्या बाजूलाच बसलेले मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मात्र पूर्णपणे शांत आणि गंभीर दिसत होते. रोहितच्या इतक्या मोठ्या विक्रमानंतरही आगरकरांच्या चेहऱ्यावर साधी स्मितरेषाही नव्हती की त्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकऱ्यांनी आगरकरांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “आगरकर आतून रडत आहेत की काय?” किंवा “निवड समिती अध्यक्षांना रोहितचा आनंद का नाही?” अशा संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
रोहित शर्माने षटकार मारला आणि अजित आगरकरच्या चेहऱ्याकडे बघा तो रडत आहे 😭🔥 #indvsnz pic.twitter.com/IObAzOYyDV
— cricketplusmeme (@cricketplusmem_) 11 जानेवारी 2026
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे वर्चस्व
भारताने वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 93 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. पण, त्याच्या बाद झाल्यानंतर भारताचा डाव डळमळीत झाला, परंतु केएल राहुलने संयम आणि समजूतदारपणा दाखवत 21 चेंडूत नाबाद 29 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.