माजी नौदल प्रमुखांना 'SIR' कडून नोटीस मिळाली.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोग विशेष सघन पडताळणी (एसआयआर) अंतर्गत मतदारयादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना त्यांची ओळख पडताळण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीस मिळाली. या नोटीसमध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या तारखांना 18 किलोमीटर अंतरावरील शहरी भागातील केंद्राच्या ठिकाणी बोलावण्यात आले. अॅडमिरल प्रकाश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंबंधी उघडपणे नाराजी व्यक्त करत एसआयआर प्रक्रियेतील त्रुटींकडे लक्ष वेधले.
भारतात ‘एसआयआर’ प्रक्रियेवर सुरू असलेल्या वाद-विवादाने आता एक नवीन वळण घेतले आहे. आता यासंबंधी प्रश्न उपस्थित करणारा एक सामान्य नागरिक नसून ते माजी भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश हे आहेत. 82 वर्षीय अरुण प्रकाश यांना ओळख पडताळणीसाठी 18 किलोमीटर अंतरावर बोलावल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अॅडमिरल अरुण प्रकाश हे केवळ माजी नौदल प्रमुखच नाहीत तर ते 1971 च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेते देखील आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. एसआयआरच्या सूचनेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने एसआयआर प्रक्रियेच्या व्यावहारिकतेबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
Comments are closed.