‘बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता’ अशी ओळ लिहिली जाईल; आमदार सतेज पाटील यांची पक्ष बदलणाऱ्यांना चपराक
सत्ताधाऱ्यांकडून पक्षफोडीच्या सत्रामुळे आज कोण कुठे जातोय, कुणालाही समजत नाही. कोण कारवाई टाळण्यासाठी, तर कोण विविध लाभांच्या स्वार्थासाठी पक्षनिष्ठा सपशेल पायदळी तुडवत आहेत. या पार्श्वभूमीवर काँगेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अशा पक्ष बदलणाऱयांवर सणसणीत चपराक लगावली आहे. ‘तीस वर्षांनी जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता’, या चार ओळी माझ्यासाठी लिहिल्या जातील, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे राजकीय हाडवैरी असलेल्या आणि अनेक पक्षांतून सध्या भाजपमध्ये असलेले खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या रुईकर कॉलनी परिसरात झालेल्या एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने, त्यांचा नेमका रोख कोणावर, हे लपून राहिले नसले, तरी याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
कोल्हापूर महापालिकेसाठी आपण 81 कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. माझ्या मुलाला वा घरातल्या सदस्याला उमेदवारी द्या म्हणून कोणत्याही पक्षश्रेष्ठाrकडे चर्चा केलेली नाही. काही नेत्यांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज भरून तो माघारीही घेतला, असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ‘मिसळ कट्टा’चा प्रचार फंडा
कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचारासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी एका हॉटेलमध्ये ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रम होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे एक हजार तज्ञ आणि प्रतिष्ठत मान्यवरांना भाजपच्या वतीने निमंत्रित केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी शहरातील 40 ठिकाणी भव्य क्रीन, ध्वनी व्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.