गोल्डन ग्लोब 2026: रेड कार्पेटवर प्रियंका चोप्रा-निक जोनासची छाप, देसी गर्लच्या लुकने वेधले लक्ष – Tezzbuzz
रेड कार्पेटवर प्रियंकाने नेव्ही रंगाचा गाउन परिधान केला होता, ज्यावर मौल्यवान हिऱ्यांचा नेकपीस तिच्या सौंदर्यात भर घालत होता. तर निक जोनास क्लासिक ब्लॅक सूटमध्ये नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत होता. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या सोहळ्यात प्रियंका चोप्रा प्रेजेंटर म्हणून सहभागी झाली होती. गोल्डन ग्लोब्सच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या प्रेजेंटर्सच्या यादीत प्रियंकासह जुलिया रॉबर्ट्स, जॉर्ज क्लूनी, मायली सायरस, ऑरलॅंडो ब्लूम, स्नूप डॉग, क्वीन लतीफा यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत प्रियांकाने (Priyanka )तिच्या आगामी चित्रपट ‘द ब्लफ’बाबत महत्त्वाची माहिती दिली. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असून, हा सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फर्स्ट लुकनंतर आता या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गोल्डन ग्लोब्सच्या मंचावर प्रियंकाचा आत्मविश्वास, ग्लॅमर आणि आगामी प्रोजेक्ट्सची झलक पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा ‘देसी गर्ल’ची क्रेझ पाहायला मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सिगारेट फूकताना पकडले गेले अरुण गोविल; ‘राम’ मानणाऱ्या चाहत्याने दिली जोरदार फटकार
Comments are closed.