भारताचा 'तिसरा डोळा' आज अवकाशात जाईल.
‘ईओएस-एन1’चे इस्रो करणार प्रक्षेपण : 504 किमी उंचीवरून बारकाईने लक्ष ठेवणार
मंडळ/श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्षात पहिला झटका देण्यासाठी सज्ज आहे. ‘पीएसएलव्ही-सी62’ मोहीम सोमवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 10:17 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होईल. या मोहिमेद्वारे एकाचवेळी 19 उपग्रहांची अवकाशात पाठवणी होणार आहे. ही मोहीम भारताच्या सुरक्षा आणि देखरेखीच्या क्षमतांना नवीन उंचीवर नेईल. ‘अन्वेषण’ असे सांकेतिक नाव असलेला ‘ईओएस-एन1’ हा उपग्रह या मोहिमेचे मुख्य आकर्षण असून तो ‘तिसरा डोळा’ म्हणून कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणाद्वारे भारत अंतराळात आणखी एक मोठी झेप घेण्यास सज्ज आहे.
पीएसएलव्ही रॉकेट आज ‘ईओएस-एन1’ उपग्रहाला अंतराळात नेणार आहे. या मोहिमेत 18 अन्य छोटे पेलोडही सामील असून ते विविध देश आणि संस्थांसाठीचे आहेत. हे प्रक्षेपण भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठे पाऊल आहे. पीएसएलव्ही म्हणजेच पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल भारताचा अत्यंत विश्वासार्ह प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपकाने यापूर्वी अनेक उपग्रहांना यशस्वीपणे अंतराळाच्या कक्षेत पोहोचविले आहेत.
‘ईओएस-एन1’ उपग्रह पृथ्वीचे अवलोकन करत हवामानाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये मदत करणार आहे. ही मोहीम भारताच्या अंतराळ कूटनीतिला दर्शविणारी असेल. ‘ईओएस-एन1’ हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह बेंगळूर येथील भारतीय खासगी अवकाश कंपनी ‘पिक्सेल’ने डिझाइन आणि विकसित केलेला एक नवीन पिढीचा रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे. स्वत:चा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणारी ही भारतातील पहिली खासगी कंपनी आहे.
2026 या वर्षाकरिता इस्रोने मोठी योजना आखली आहे. इस्रो मार्च 2026 पर्यंत 7 मोहिमा पूर्ण करणार आहे. यात क्रू नसलेली रोबोटिक टेस्ट आणि ग्रहांचा शोध यासारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा सामील आहेत. इस्रोसाठी हे किफायतशीर नवोन्मेषाचे एक आकर्षक उदाहरण असेल. भारत एक क्षेत्रीय खेळाडूपासून एक प्रमुख जागतिक अंतराळशक्ती होण्याच्या मार्गावर असल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी म्हटले आहे.
‘ईओएस-एन1’ची मुख्य वैशिष्ट्यो आणि कार्ये…
हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग : ‘ईओएस-एन1’ हा हायपरस्पेक्ट्रल कॅमेराने सुसज्ज असून तो 140 हून अधिक स्पेक्ट्रल बँडमध्ये प्रतिमा कॅप्चर करू शकतो. हा इतर पारंपरिक उपग्रहांपेक्षा वेगळा असून फक्त 3-4 बँडमध्ये कार्य करतो. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग वनस्पतींचे आरोग्य, मातीतील ओलावा, प्रदूषण, खनिजे, तेल गळती इत्यादींबद्दल खूप तपशीलवार माहिती प्राप्त करू शकतो.
उपयोग : शेती (पीकांचे आरोग्य, कीटक आणि रोग शोधणे), पर्यावरणीय देखरेख (जंगलातील आग, प्रदूषण), खाणकाम (खनिज शोध), आपत्ती व्यवस्थापन (पूर, दुष्काळ), शहरी नियोजन आणि संरक्षण.
राष्ट्रीय सुरक्षा : ‘ईओएस-एन1’ हा उपग्रह ‘अवकाशातील डोळा’ म्हणून काम करेल. या उपग्रहामुळे भारताच्या सीमा सुरक्षित करण्यात आणि शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात लष्कराला मोठी मदत होणार आहे.
कक्षा आणि क्षमता : हा उपग्रह 500-600 किमी उंचीवर लो अर्थ ऑर्बिटमध्ये कार्यरत राहणार आहे. तो दररोज मोठ्या क्षेत्रांचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करू शकतो.
Comments are closed.