WPL 2026 – यास्तिका भाटिया गुजरात जायंट्समधून बाहेर

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) 2026 हंगामाला सुरुवात होण्याआधीच गुजरात जायंट्सला मोठा झटका बसला आहे. संघाची यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिची उपलब्धता आधीपासूनच संशयात होती आणि अखेर ती या हंगामात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

डब्ल्यूपीएल प्रशासनाने लिलावापूर्वीच सर्व प्रैँचायझींना कळवले होते की, यास्तिका भाटियाला खरेदी केल्यास तिच्या अनुपस्थितीत पर्यायी खेळाडूची परवानगी दिली जाणार नाही. तरीही गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांनी तिच्यासाठी बोली लावली होती. अखेर गुजरात जायंट्सने 50 लाख रुपयांना यास्तिकाला आपल्या ताफ्यात घेतले. दरम्यान, गुजरात जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक मायकेल क्लिंगर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून यास्तिकाला शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.