विराट कोहली घरात ठेवत नाही ‘सामनावीर’ ट्रॉफी! 45 वा पुरस्कार जिंकल्यानंतर उघड केलं खास गुपित
विराट कोहलीचे (Virat Kohli) वय वाढत असले, तरी त्याचे विक्रम मोडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. न्यूझीलंडविरुद्ध वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने 28,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. 11 जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात त्याने 93 धावांची शानदार खेळी केली, ज्यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 49 व्या षटकात 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयात विराटच्या 93 धावांसोबतच कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) 56 धावांचा मोलाचा वाटा होता. वनडे क्रिकेटमध्ये विराटला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ मिळण्याची ही 45 वी वेळ होती.
सामन्यानंतर विराटने एक रंजक गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की, तो स्वतःकडे या ट्रॉफी ठेवत नाही. विराट म्हणाला, मी या सर्व ट्रॉफी गुडगावला माझ्या आईकडे पाठवून देतो, कारण तिला ट्रॉफी जमा करायला खूप आवडते. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना हे सर्व स्वप्नवत वाटते. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सचिन तेंडुलकर: 62 वेळा
संथा जयसूर्य : ४८ वेळ
विराट कोहली: 45 वेळा
Comments are closed.