ज्येष्ठ डावे नेते समीर पुततुंडा यांचे बंगालमध्ये निधन झाले

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील वरिष्ठ डावे नेते समीर पुताटुंडा यांचे दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 74 वर्षांचे होते, तर त्यांच्यामागे परिवारात त्यांच्या पत्नी अनुराधा आहेत.

समीर पुताटुंडा यांनी रविवारी रात्री सुमारे 11.15 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. पुताटुंडा हे पश्चिम बंगालच्या डाव्या आंदोलनाचा एक प्रख्यात चेहरा होते. तसेच माकपचे प्रभावशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती. परंतु नंतरच्या काळात वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडला होता आणि सैफुद्दीन चौधरी यांच्यासोबत मिळून पार्टी ऑफ डेमोक्रेटिक सोशलिजमची (पीडीएस) स्थापना केली होती. सिंगूर आणि नंदीग्राम यासारख्या मोठ्या जनआंदोलनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुताटुंडा यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  एखादा स्वकीय गमावल्याचे वाटत असल्याचे उद्गार काढले आहेत.

Comments are closed.