अरेरे…! ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी क्रिकेटरची फजिती; आऊट नसतानाही पॅव्हेलियनमध्ये बोलावलं, VIDEO

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत होता. ही मालिका अनिर्णित राहिली असली, तरी पाकिस्तानच्या माजी कर्णधार मोहम्मद रिझवानसाठी मात्र सध्याचा काळ अत्यंत कठीण ठरत आहे. राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला रिझवान सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळत आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे फलंदाजी अजिबात प्रभाव पाडू शकलेला नाही.

सोमवारी सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात झालेल्या सामन्यात रिझवानने नकोशा विक्रमाची नोंद केली. तो बीबीएलच्या इतिहासातील निवृत्त बाद (Retired Out) होणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. टी-20 फॉरमॅटमध्ये कसोटी शैलीत फलंदाजी करत असल्याने त्याच्यावर हा निर्णय घेण्यात आला.

सामन्यात सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी केली. जोश ब्राउन आणि टिम सिफोर्ड यांनी आक्रमक सुरुवात करत संघाला चांगली गती दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान फलंदाजीस आला. मात्र, त्याची संथ फलंदाजी लगेचच चर्चेचा विषय ठरली.

मेलबर्न रेनेगेड्सच्या डावाच्या 18व्या षटकापर्यंत रिझवानने 23 चेंडूत फक्त 26 धावा केल्या होत्या. शेवटची काही षटकं शिल्लक असताना संघाला जलद धावांची गरज होती, पण रिझवान आक्रमक खेळ करण्यास तयार दिसत नव्हता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत त्याला त्याच धावसंख्येवर निवृत्त केले. तरीसुद्धा, मेलबर्न रेनेगेड्सला अपेक्षित फटका बसला नाही आणि संघाला 20 षटकांत केवळ 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. रिझवानने वेळीच गती वाढवली असती, तर ही धावसंख्या अधिक असू शकली असती.

या बीबीएल हंगामात रिझवानने आतापर्यंत आठ सामन्यात फलंदाजी केली आहे. मात्र, एकदाही त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या 41 असून ती त्याने 4 जानेवारी रोजी केली होती. संथ फलंदाजी आणि प्रभावहीन कामगिरीमुळेच त्याला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले, तसेच कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले.

सध्याची कामगिरी पाहता, मोहम्मद रिझवानसाठी पाकिस्तानच्या टी-20 संघात पुनरागमन करणे सध्या तरी अवघडच दिसत आहे.

Comments are closed.