इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफची घोषणा, हिंदुस्थानवर काय होणार परिणाम?

व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेची नजर इराणवर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लष्करी कारवाई करू शकतो असे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत. एवढेच नाही तर अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश दिले. एवढेच नाही इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फटका हिंदुस्थानलाही बसणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…
कथा | ट्रम्प यांनी इराणसोबत 'कोणत्याही देशा'च्या व्यापारावर 25% शुल्काची घोषणा केली, या निर्णयाचा भारत, चीन, UAE वर परिणाम होऊ शकतो
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की इराणसोबत “व्यवसाय” करणाऱ्या कोणत्याही देशाला वॉशिंग्टनसोबतच्या व्यापारावर २५ टक्के शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे परिणाम होऊ शकतो… https://t.co/pufVMqShhP
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 13 जानेवारी 2026

Comments are closed.