किंग कोहलीचा रेकॉर्ड धोक्यात! युवा स्टार वैभव सूर्यवंशी फक्त इतक्या धावा करताच रचणार नवा इतिहास

इंडिया अंडर-19 क्रिकेट टीमने आता आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला वेग दिला आहे. या टीममध्ये अनेक सुपरस्टार खेळाडू दिसत आहेत, ज्यामध्ये कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre & Vaibhav Suryavanshi) आणि उपकर्णधार वैभव सूर्यवंशी यांच्या नावाचाही समावेश आहे. वैभव सातत्याने धावा करताना दिसत आहे, त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या आयसीसी इव्हेंटमध्ये वैभवकडे दिग्गज विराट कोहलीला मागे टाकण्याची मोठी संधी आहे.

14 वर्षांचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मध्ये फक्त 6 धावा अधिक करताच विराट कोहलीचा (Vaibhav Suryavanshi) मोठा रेकॉर्ड मोडेल. विराट कोहलीने अंडर-19 युथ वनडेमध्ये 28 सामने खेळले होते, ज्याच्या 25 डावांमध्ये त्याने 46.57 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. तर आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने 18 सामन्यांत 54.05 च्या सरासरीने 973 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत वैभव फक्त 6 धावा करताच ‘किंग कोहली’ला मागे टाकेल.

या बाबतीत नंबर 1 वर विजय जोल दिसत आहे. जोलने 2012 ते 2014 दरम्यान एकूण 36 युथ वनडे खेळले होते, ज्यामध्ये त्याने 42.54 च्या सरासरीने 1404 धावा केल्या आहेत. जोल हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने अंडर-19 युथ वनडेमध्ये 1400 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

युवा सुपरस्टार वैभव फक्त किंग कोहलीलाच नाही, तर शुबमन गिल (Shubman gill and Yashsvi jaiswal) आणि यशस्वी जयस्वाल यांनाही मागे टाकू शकतो. टीम इंडियाच्या या दोन्ही सुपरस्टार खेळाडूंना मागे टाकण्यासाठी वैभवला या स्पर्धेत 400 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. सध्या वैभव ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता त्याच्यासाठी 400 पेक्षा जास्त धावा करणे खूप सोपे दिसत आहे. गिल आणि जयस्वाल यांनीही अंडर-19 क्रिकेटमध्ये खूपच अप्रतिम कामगिरी केली आहे.

Comments are closed.