Eggs : अंड्यासोबत चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ, फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
अंड्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. अंड्याच्या सेवनाने शरीरातील स्नायू मजबूत होतात. त्यामुळे कित्येक घरात सकाळच्या नाश्त्यात अंड्याचा समावेश असतो. अंडी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम नाश्ता आहे. मात्र काही पदार्थांसोबत अंडी खाणं वर्ज्य सांगितलं जातं. आज आपण अंडी कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नयेत हे पाहूयात.
- सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्यास प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे सोया मिल्कसोबत अंडी खाणे टाळावे.
- अंडी आणि साखर एकत्र खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड्यासोबत साखर खाऊ नये.

- दूध आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसोबत अंडी खाऊ नयेत, कारण यामुळे पचन बिघडू शकते.

- केळी आणि खरबूज यांसारखी फळे अंड्यांनंतर लगेच खाऊ नयेत, असे केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.

- मांसासारख्या मांसाहारी पदार्थांसोबत अंडी खाल्ल्याने सुस्ती येऊ शकते किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

- मासे आणि उकडलेले अंडे एकत्र खाल्ल्याने त्वचेची ॲलर्जी होऊ शकते.
हेही वाचा – Health Tips: दररोज सफरचंद खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या
Comments are closed.