डोंबिवलीतील भाजप-शिवसेना राडा; शिंदे गटाचे दोन उमेदवारांना पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय?

KDMC निवडणूक 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेमधील (Kalyan Dombivli Election 2026) पॅनल क्रमांक 29 हा प्रभाग सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या प्रभागांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील पहिली लढत शिवसेना विरुद्ध भाजप (BJP ShivSena Clash in Dombivli) अशी मैत्रीपूर्ण होत असून आरोप-प्रत्यारोपामुळे ही लढत चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रभाग क्रमांक 29 मधील सुनील नगर तुकाराम परिसरात भाजप पदाधिकाऱ्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराकडून केला जातोय. अशातच कालावधी (१३ जानेवारी) रात्रीच्या सुमारास याf आणि कारणावरून शिवसेना आणि भाजप पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. याच वादात दोन्ही गटातले पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

दरम्यानआज त्यांना डोंबिवली पोलिसांनी अटक करत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयात दोघांना तपासण्यासाठी आले असता दोघांच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळालंहे.तर पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांचा निषेध व्यक्त केलाय. झालेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचेहे ते म्हणालेत.

दरम्यान, या राड्यात रंजना नितीन पाटील या शिवसेनेच्या उमेदवार असून जखमी नितीन पाटील यांची पत्नी आहे. रंजना यांनी पोलिसांना जाब विचारत काही बरेवाईट झाले तर याला पोलीस जबाबदार असतील, असा इशारा दिलाहे. तर चुकीची माहिती देऊन पोलिसांनी रुग्णालयातून नितीन पाटील आणि रवी पाटील यांना बाहेर काढून पोलीस ठाण्यात हजर केले, हा अन्याय आहे. असेही त्या म्हणाल्या.

KDMC Election 2026: पोलिसांकडून रूट मार्च काढत शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन

डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये काएल (१३ जानेवारी) रात्रीच्या सुमारास शिवसेना आणि भाजप उमेदवारांमध्ये झालेल्या वादामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दोनशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी परिसरात बंदोबस्त ठेवला असून असा काही प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर रात्री उशिरा परिसरात रूट मार्च काढत परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.