नफा घेण्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण होते.

फार्मा, ऑटो समभागांवर दबाव : इराणवरील निर्बंधाचा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

आशियातील बाजारात सकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअरबाजारात सकाळच्या सत्रात तेजी होती. नफावसुलीच्या कारणास्तव व रिलायन्ससारख्या दिग्गज समभागाच्या घसरणीचा परिणाम तसाच सेन्सेक्स, निफ्टीवर दिसला. सेन्सेक्स 250 अंकांनी घसरणीत राहिला होता. फार्मा, रिअल्टी, ऑटो व एफएमसीजी क्षेत्रातील समभागांची विक्री गुंतवणूकदारांनी केलेली दिसून आली.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरुन 83627 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 58 अंकांनी घसरत 25732 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभागांवर दबाव पाहायला मिळाला तर 10 समभाग मात्र तेजीसह बंद झाले होते. आयटी व मेटल तसेच बँकिंग क्षेत्रातील समभागांनी चमकदार कामगिरी केली होती. रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग घसरणीत होता तर टीसीएस, एचसीएल टेक समभागांची विक्री करुन गुंतवणूकदारांनी नफावसुली केलेली दिसली.

भारतात आलेले अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्यामुळे पुन्हा भारत-अमेरिका व्यापार चर्चेत आशा वाढल्या आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नवे प्रतिबंध जारी केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता दिसून आली. ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के अतिरीक्त टॅरिफ लावण्याचे जाहीर केले आहे.

हे समभाग तेजीत

शेअर बाजारात पाहता मंगळवारी ओएनजीसी, इटर्नल, टेक महिंद्रा, हिंडाल्को, आयसीआयसीआय बँक व मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग तेजीत होते. यासोबत टीसीएस, एसबीआय, विप्रो, नेस्ले, श्रीराम फायनान्स, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल यांचे समभागदेखील मजबुतीसोबत बंद झाले होते. मिडकॅपमध्ये ऑइल इंडिया, अपोलो टायर्स यांचे समभाग नफ्यात होते.

Comments are closed.