Jalgaon : जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची मोठी कारवाई; तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी जप्त
जळगाव क्राईम न्यूज : जळगाव महापालिका निवडणुकीच्या (Jalgaon Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर ममुराबाद नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात एका कारची तपासणी केली असता तब्बल 29 लाख रुपये रोकड, 3 किलो चांदी व 8 तोळे सोने आढळून आले आहे. कारमधील तिघांनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूरहून जळगाव (Jalgaon) येथील सराफा दुकानांसाठी नेल्याचे सांगितले, परंतु त्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. परिणामी पोलिसांनी पंचनाम्यानंतर हा मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात घेतला असून, पावत्या सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. फक्त कायदा निवडणुकीच्या काळात संशयास्पद रोकड आणि सोनेचांदी सापडून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय आता पोलीस तपासाअंती सत्य कळू शकणार आहे. फक्त, निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांचीहे मोठी कारवाई असून पावत्या नसल्याने संशय बळावला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.