ग्रीक गॉडची लव्हस्टोरी कायम चर्चेत; एक पत्नीपासून घटस्फोट, दुसरीने केले कोर्टात दावे, तिसरी 12 वर्षांनी आहे लहान अभिनेत्री – Tezzbuzz
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन आज ५२ वर्षांचा आहे. शिस्तबद्ध जीवनशैली, मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हँडसम आणि हंक हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋतिकने आतापर्यंत ४२ हून अधिक चित्रपटांत काम केले असून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. इतकी सुलझलेली प्रतिमा असतानाही, ऋतिकच्या वैयक्तिक आयुष्यातील केवळ तीन प्रेमकथा नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. यामध्ये एका नात्याचा घटस्फोट झाला, एका प्रकरणात त्याला कोर्टात खेचले गेले, तर सध्या तो स्वतःपेक्षा १२ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत आहे. विशेष म्हणजे, त्याची एक्स वाइफ आणि सध्याची गर्लफ्रेंड एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
हृतिकने (Hrithik)२००० साली प्रदर्शित झालेल्या कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटाने तो सुपरस्टार बनला. यानंतर मिशन कश्मीर, यादें, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. विशेष बाब म्हणजे, करिअरच्या सुरुवातीलाच ऋतिकच्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्याने २००० साली सुझैन खानसोबत लग्न केलं. दोघांनाही दोन मुलगे झाले आणि बराच काळ त्यांचं नातं आदर्श मानलं जात होतं.
सुमारे १० वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर ऋतिक आणि सुझैनमध्ये मतभेद वाढू लागले आणि अखेर २०१४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर ऋतिकच्या आयुष्यात मोठा वादळ आलं. २०१३ साली कृष ३ चित्रपटादरम्यान ऋतिक आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. २०१६ मध्ये कंगनाने एका मुलाखतीत हे नातं असल्याचा दावा केला आणि ऋतिकला ‘सिली एक्स’ असं संबोधलं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
या प्रकरणानंतर ऋतिकने कंगनाविरोधात डिफेमेशन नोटीस पाठवली. प्रत्युत्तरादाखल कंगनानेही अनेक दावे केले. ऋतिकच्या टीमने आरोप केला की कंगनाने त्याला १४ हजारांहून अधिक ईमेल्स पाठवल्या होत्या, ज्यातील काही अतिशय वैयक्तिक होत्या. मात्र कंगनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि हा कट असल्याचं सांगितलं. काही काळानंतर हे प्रकरण शांत झालं.
अनेक वादांनंतरही ऋतिक रोशन आजही आपल्या कामासाठी ओळखला जातो. सध्या तो स्वतःपेक्षा १२ वर्षांनी लहान अभिनेत्री सबा आजादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे, सबा आजाद आणि ऋतिकची एक्स वाइफ सुझैन खान यांच्यात चांगली मैत्री आहे. नुकत्याच १० जानेवारीला ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझैनने ऋतिक आणि सबाच्या नात्यावर प्रेम व्यक्त केलं आणि पार्टीतही ती दोघांसोबत दिसली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
युजवेंद्र चहल आणि धनश्री रियलिटी शोमध्ये एकत्र? क्रिकेटरने स्पष्ट केले सत्य
Comments are closed.