किंग कोहली इज बॅक! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट पुन्हा नंबर 1
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा वनडे सामना राजकोट येथे खेळला जात आहे. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे. सातत्यपूर्ण धावा, मोठ्या सामन्यांतील प्रभावी खेळी आणि अनुभवाच्या जोरावर कोहलीने अव्वल क्रमांकावर पुनरागमन केलं आहे.
विराट कोहलीने मागील वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराटने 2 शतक व 1 अर्धशतक झळकावले. शिवाय या वर्षाच्या सुरुवातीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने 93 धावांची खेळी केली होती.
Comments are closed.