वॉशिंगटन सुंदरच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी; दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मधून कोण
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे प्लेइंग इलेव्हन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या लढतीचा नाणेफक झाले असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकनंतर दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल केला आहे. वॉशिंगटन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने भारतीय संघातील बदल आधीच निश्चित मानला जात होता.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia बॅट मध्ये ठेवले आहेत.
अपडेट्स ▶️ https://t.co/8G8p1tq1RC #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0XDygtILp6
— BCCI (@BCCI) 14 जानेवारी 2026
न्यूझीलंडकडून ‘या’ खेळाडूचा वनडे पदार्पण
राजकोटच्या नीरंजन शाह स्टेडियमवर भारताचा हा पाचवा वनडे सामना आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध या मैदानावर पहिल्यांदा खेळणार आहे. न्यूझीलंडने या सामन्यात डावखुरा फिरकीपटू जेडन लिनिक्स याला वनडे पदार्पणाची संधी दिली आहे. त्याने आदित्य अशोक याची जागा घेतली आहे.
आयुष बदोनी नाही; नितीश कुमार रेड्डीला संधी
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर, अपेक्षेप्रमाणे वॉशिंगटन सुंदर या सामन्यात खेळत नाही. वडोदऱ्यातील पहिल्या वनडेदरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. सुंदरच्या जागी संघात आयुष बदोनीचा समावेश करण्यात आला होता; मात्र पदार्पणाची संधी देण्याऐवजी टीम मॅनेजमेंटने अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी याच्यावर विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे, नितीश रेड्डी आधीपासूनच या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग होता.
#TeamIndia प्लेइंग इलेव्हन 2️⃣व्या ODI साठी लॉक इन केले आहे 🔒
अपडेट्स ▶️ https://t.co/8G8p1tq1RC #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ysCIfYobtN
— BCCI (@BCCI) 14 जानेवारी 2026
हेड-टू-हेड रेकॉर्ड, कोणाचा वरचष्मा?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा विचार केला, तर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 121 सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 63 सामने जिंकत स्पष्ट आघाडी घेतली आहे, तर न्यूझीलंडला 50 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.
खेळपट्टीचा अहवाल
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, संध्याकाळच्या वेळेस दवाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. वडोदऱ्यातील पहिल्या वनडेमध्येही भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला होता.
हे ही वाचा –
Team India Rift News : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद?; कोच म्हणाला, रोहित-विराट आणि गंभीर…
आणखी वाचा
Comments are closed.