वनडेचा ‘किंग’ पुन्हा विराटच! पण दुसऱ्या सामन्यात अपयश, ICC रँकिंगमध्ये रोहितची बादशाही संपली, क

विराट कोहलीने एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माला मागे टाकले: भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय (ODI) क्रमवारीत रनमशिन विराट कोहलीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत प्रथम स्थान पटकावले आहे. मात्र, एकीकडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले असतानाच, दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराटला मोठी खेळी खेळण्यात अपयश ठरला आहे.

विराट पुन्हा नंबर 1, रोहितची घसरण

गेल्या काही काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या रँकिंगमध्ये विराटने झेप घेतलं असून त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर घसरण गेला आहे. रोहितची बादशाही संपवत विराटने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तोच एकदिवसीय क्रिकेटचा खरा ‘किंग’ आहे.

दुसऱ्या सामन्यात विराट स्वस्तात बाद

क्रमवारीतील आनंदाच्या बातमीसोबतच चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी राजकोटमधून आली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो केवळ 23 धावा करून बाद झाला. विराटने 29 चेंडूचा सामना केला, पण ख्रिस क्लार्कच्या गोलंदाजीवर तो आपली विकेट देऊन बसला. कोहली स्वस्तात बाद झाल्याने भारतीय डावाला अपेक्षित वेग मिळाला नाही.

1736 दिवसांनंतर विराट पुन्हा नंबर 1

जवळपास 4 वर्षे 9 महिने आणि तब्बल 1736 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहली पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज ठरला आहे. 13 एप्रिल 2021 पर्यंत विराट अव्वल स्थानी होता, मात्र 14 एप्रिल 2021 रोजी पाकिस्तानचा बाबर आझम त्याच्या जागी पोहोचला होता. आता दीर्घ काळानंतर विराटने पुन्हा एकदा रँकिंगच्या शिखरावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावून आपली फॉर्ममध्ये असलेली बॅट दाखवली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत खेळलेली 93 धावांची दमदार खेळी त्याला पुन्हा नंबर 1 बनवण्यासाठी निर्णायक ठरली.

आयसीसी वनडे रँकिंग

  • विराट कोहली – 785 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर
  • डॅरेल मिचेल (न्यूझीलंड) – 784 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर
  • रोहित शर्मा – 775 पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे
  • शुभमन गिल – पाचव्या क्रमांकावर
  • श्रेयस अय्यर – दहाव्या क्रमांकावर आहे

हे ही वाचा –

Rohit Sharma : हिटमॅनचा मोठा फटका, पण चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी, इतक्या धावांवर OUT

आणखी वाचा

Comments are closed.