बांगलादेश आपल्या जिद्दीवर ठाम! टी-20 वर्ल्ड कपसाठी घातली नवी अट, आयसीसी पुढे काय पाऊल उचलणार?
टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international World Cup 2026) बाबतचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पत्र लिहून स्पष्ट केले होते की, ते वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नाहीत. त्यांनी आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती.
नुकत्याच झालेल्या बैठकीत आयसीसीने बांगलादेश संघाला भारतात पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर आता BCB चे उपाध्यक्ष शेखावत हुसेन यांचे मोठे विधान समोर आले आहे. त्यांच्या बोलण्यावरून असे स्पष्ट होत आहे की, बांगलादेश क्रिकेट बोर्ड अजूनही आपल्या हट्टावर ठाम आहे.
BCB च्या उपाध्यक्षांनी भारतात न खेळण्याच्या अटीबाबत काही नवीन गोष्टी मांडल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बांगलादेश संघ टी20 वर्ल्ड कप 2026 खेळण्यासाठी भारतात येणार नाही. आयसीसीने बांगलादेशच्या सामन्यांसाठी इतर पर्यायी ठिकाणांचा (Venues) विचार करावा.
सध्याच्या परिस्थितीनुसार ICC कडे तीन मार्ग उरले आहेत. बांगलादेशच्या अटी मान्य करून त्यांचे सामने श्रीलंकेत हलवणे. तसेच दुसऱ्या पर्यायी मार्गांचा अवलंब करणे ज्यावर अद्याप चर्चा सुरू आहे.
Comments are closed.