Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

मुंबई: भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “निवडणूक ही एक लढाई आहे आणि ती जिंकण्यासाठी घाम गाळावा लागतो, पण हे नेते घराबाहेर पडायलाच तयार नाहीत,” अशा शब्दांत कदमांनी दोन्ही ठाकरेंना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी खूप गाजावाजा केला, पण मुंबई, ठाणे आणि नाशिक सोडून ते राज्याच्या इतर भागात पोहोचलेच नाहीत. “हा एवढाच महाराष्ट्र आहे, असे त्यांना कोणीतरी सांगितले असावे,” असा टोला राम कदम यांनी लगावला.

निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरून प्रचार करणे आवश्यक असते. जे नेते घराबाहेर पडत नाहीत, त्यांना निकालानंतर इतरांना दोष देण्याचा किंवा इतर महापालिकांविषयी बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे कदम म्हणाले.

मराठी भाषेसाठी स्वतःच्या योगदानाचा उल्लेख करताना राम कदम म्हणाले की, “मराठी भाषेसाठी सर्वात मोठे योगदान मी दिले आहे. त्या मुद्द्यावरून माझे चार वर्षांसाठी निलंबनही झाले होते.

ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची नसून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उबाठा) आणि मनसेचे अस्तित्व संपण्याची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments are closed.