Mumbai News – निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दिमतीला ‘अ‍ॅक्वा लाईन’; भुयारी मेट्रो उद्या मध्यरात्रीपर्यंत धावणार

महापालिका निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे. उद्या 15 जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदानाच्या कार्यात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोच्या ‘अ‍ॅक्वा लाईन’ने (मेट्रो-3) कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी भुयारी मेट्रोची सेवा गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी भुयारी मेट्रोच्या विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी मेट्रोची सेवा पहाटे 5.00 वाजल्यापासूनच सुरू होईल. तसेच, रात्री उशिरापर्यंत कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सामान्य दिवसांच्या तुलनेत मतदानाच्या दिवशी या विशेष फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

Comments are closed.