निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ कमी केली, आता ‘ही’ असेल वेळ

मुंबईसह सर्व २९ महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने मुंबईतील मतदानाचा वेळ एक तासाने कमी केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले होते. साधारणत: आतापर्यंतच्या सर्व निवडणूका याच वेळेत पार पडल्या आहेत. मात्र यंदा मतदान 7.30 वाजता सुरू होणार असून सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. दरवेळेप्रमाणे या निवडणूकीतही मतदारांना मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Comments are closed.